काव्य-सरिता
आठवणींचा एक
विसावा
पैलतिराची ओळख पटली ऐलतीराला विसरू नको
रंगून जाता सखयासंगे अम्हा कधी तू विसरू नको
बालमित्र अन त्यांची मैत्री बाल्यासंगे सोडू नको
जोपासावी विरहासंगे तिला कधी तू विसरू नको
पुढे पहाणे पुढेच जाणे हीच जगाची
रीत खरी
मागे उरले ते दुसऱ्याचे ही वृत्ती तर नव्हे खरी
पुढचे पाऊल पुढे पडू दे ठसे मागचे
पुसू नको
आठवणींची गोड शिदोरी बेचव कधी तू करू नको
देव्हा-याच्या कोन्यामध्ये
तुझ्या असू दे जुन्या स्मृती
विलसतील त्या रोज एकदा ज्योतीसंगे निरांजनी
ज्योतीच्या त्या स्नेहाला ते जळून जाता विसरू नको
काजळ होउनी नयनी शोभू अश्रूंसन्गे
ढाळू नको
अनंत असती मनी पायऱ्या आठवणींच्या मोजू नको
आठवणींचा एक विसावा तोच कधी तू विसरू नको
डॉ. निशिकांत श्रोत्री
स्रोत: मनाची
पिल्ल
वक्षामृत नवमी
सोसूनिया गे तू कळा प्रसवीले तुझ्या बाळा
जन्म सार्थक जाहला पाजी तया वक्षामृत ||१||
सुवर्णाचा थोर तास चीक पाजावा बाळास
प्रतिबंध हो रोगास तया दिव्य संजीवनी ||२||
छातीवरी तया घेई स्तनमंडळ ते दावी
स्तनाग्रांना चोखायला बाळा पुढे सरकायाला ||३||
नको साखर ना पाणी मध ही ना त्या चाटवी
तुझ्या पयोनिधीतून पूर्ण अन्न साक्ष होई ||४||
सहा मास देई स्तन्य वक्षामृतासि पाजून
दुजे नको काही अन्य अमृत ते उरोजन्य ||५||
बाळासाठी झोपेतून रात्रंदिन तू जागून
स्तनपान त्या देऊन होते बलसंवर्धन ||६||
वर्षांपोत्तर तू दोन देई पूरक त्या अन्न
सवे पाजी त्यासी स्तन्य वाण तुझे मातृत्वाचे ||७||
पाज-पाजता बाळासी चार गोष्टी सांगी त्यासी
हितगुज तया संगे स्तनपान किती रंगे ||८||
सर्व गुणांनी पावन दिव्य स्पर्श तो घेऊन
पसायाचे करी दान करी मातृत्वासि धन्य ||९||
डॉ. निशिकांत श्रोत्री
परंपरा
दीप उजळला अध्यात्माचा मार्ग दाविण्या ज्ञानाचा
प्रभा फाकली साज लेउनी भारतरूपी मायेचा ||ध्रु||
ज्योत तेवली वेदपुराणे तेज त्या ओंकारचे
व्यासमुखे उद्घोषित झाले सकाळ ज्ञान या विश्वाचे
कायाबुद्धी लयास जावो गूढ जीवना अर्थ खरा
भगवंतांच्या मुखात गीता दिशा द्यावयाला कर्मा ||१||
आर्यसत्य ही चतुःसिमेची साक्ष जाहली बुद्धाते
पवित्र त्यांचा अष्टमार्ग हा मुक्ती द्याय जीवाते
ग्लानि हटविण्या धर्मावरची अंत साधूया द्वैताचा
थोर ग्रंथ साकारून आले ठेवा शांकरभाष्याचा ||२||
साथ घेऊनि मायबोलिची सिद्ध ज्ञानियांचा राजा
बंधुत्वाची अखंड दिंडी सवे गेउनी संतांना
सर्वधर्मसमभाव सांगण्या साई सागर प्रेमाचा
सत्य अहिंसा अमर ज्ञान हे हाच वारसा बापूंचा ||३||
थोर अमुची परंपरा ही उद्धरण्याला विश्वाला
तोच वारसा अमुच्या माथी प्रेम वाटण्या जगताला
सत्य, धर्म अन प्रेम, शांतिचे कमल उमलले मोहविण्या
तेज उजळुनी गंध दरवळे भारतभूच्या मातीचा ||४||
डॉ. निशिकांत श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
स्रोत: अर्चना
अमृत तव वक्षीचे
डॉ. निशिकांत
श्रोत्री
प्रसविलेस तू गोंडस बाळा जन्म सार्थ जाहला
अमृत पाजी तव वक्षीचे कवच कुंडले बाळा ||धृ||
सुवर्ण तासामध्येच बाळा चीक देई कोवळा
रोगांचा प्रतिबंध कराया संजीवनी दे बाळा
घेउनिया छातीवरती गे दावी स्तनमंडळा
अमृत पाजी तव वक्षीचे कवच कुंडले बाळा ||१||
स्तन्यच केवळ षण्मासास्तव दुजा न काही काला
नको शर्करा घालुन पाणी मध न चाटवी बाळा
पूरक अन्नासवे दूध तव दोन वर्ष दे बाळा
अमृत पाजी तव वक्षीचे कवच कुंडले बाळा ||२||
निद्रेतुनही बाळासाठी रात्रंदिन तू जाग
बलसंवर्धन होईल त्याचे वक्षस्राव तव भोग
सर्व गुणांचा पवित्र दिव्य स्पर्श पसायाला
अमृत पाजी तव वक्षीचे कवच कुंडले बाळा ||३||
डॉ. निशिकांत
श्रोत्री
mla maf krxIl ka?
mla maf krxIl ka?
he kivte, mla maf krxIl ka?
ALlDxa icmukLya xExvat
nVhtI maZya Aja` bu²Ijv;
kslIc Anuwva.cI ixdorI
teVhapasUn maZya inVyaRj inrags bo3ala
AapLya trl klaTmk hatat 2+n
mo#ƒa mayene 6e}n gelIs mla
mra#I sarSvtaCya 6nda3 kannat
Ao;q k+n ´ayla
jIvnaCya sO.dyaRcI An\ giwRta4aRcI
ko` AapulkIne
trIhI mI tula ivsrlo
mla magR daqiv`a–ya maZya kivte
mla maf krxIl ka?
kaVyace iviv2r.gI magR coqa;ta.na mI
Avq; p/eysIsarqI
k2I muKt7.dat naclIs
tr 0qa´a pitv/tesarqI
k2I maZya gIta.na wavsurat gaylIs
k2I maz. p/em Aa;ivles AatRp`e
tr k2I ivrhgIta.na !s!sUn rDlIs
ic.tnala maZya
tTv)anace p/vcn bnUn ]trlIs
maZya risk vacka.Cya ¹dyat Algdp`e
trIhI AapTp/s.gI mI ma5
Tyag kela tuza ¡t^np`e
he maZya sqI kivte
mla maf krxIl ka?
ja`Un 6e g mla maZya kivte
k2I nEraXyaCya qa{t
zalo ivl9` ]iµGn
tr k2I nixbaCya pDleLya
ivpirt faxa.nI
kele mla wGn i7¶ ivi7¶
mla ma5 txatc
nVhtI pvaR kxacI na hotI ja` Aasm.tacI
ve; AalI hotI
hoTyac. nVhte VhaycI
Aai` mla ivsr pDla tuMha sg;ƒa.cac g!
inixg.2asarqI g.i2t ho}n ful`arI
mazI k4a gelI komejUn
svaR.na samavUn 6e`arI
mazI kad.brI gelI AaksUn
maZya mnaCya ipLla.na ]6D. kr`a–ya fDta;acI
b.d zalI kvaD. AkSmat
Aai` tuZyasarqI
m<d\g.2I kivta g;Un gelI
in6<R`tene in*#urtene
mnaCya ivmnSk AvS4et
do8 ko`aca kahIc k;ena
trIhI zalI Aahe Aata
AGnIprI9et horp;lelI ]prtI
he prmeXvrSv+pI maZya 9maxIl kivte
mla Aata trI maf krxIl ka?
suqd:qaCya sarIpa3avr
Aai` yxopyxaCya ih.do;ƒa.vr
Aayu*yaCya p/Tyek soPya Av6D v;`avr
mateCya vaTsLyane,
gu=jna.Cya ktRVywavnene
Aai`
p/eysICya AatR p/emane
sdEv mla sa4 de`a–ya
maZya ivxal¹dyI p/Iy kivte
puNha maze bo3 2rxIl ka?
mla maf k+n
puNha tuZya pdrat 6exIl ka?
डॉ. निशिकांत श्रोत्री
Ushaswapna Song :: उषास्वप्न गीत :
Lyrics : Dr. Nishikant Shrotri
Music : Vilas Adkar
Singer : Manjushri Oka
Close the Tab of your Browser to Return back to this page.